![]() |
Landscape from Vaghajai Temple |
कोराईगाडचा ट्रेक
पाठीमागाच्याच आठवड्यात पूर्ण केल्यामुळे थोडा उत्साह होताच म्हणून ह्या शनिवारी
(दिनांक २७ जून १५ ) राईरेश्वरचा किल्ला सर करण्याचा बेत ठरला , पण आयत्या वेळी तोफेत पाणी मित्र बोलला “यार
नही होगा इस शनिवार”. त्यामुळे मी हि तलवार म्यान करून ठेवली. शनिवार लोळून
घालवायचा विचार करत होतो तितक्यात शुक्रवारी रात्री सुदीपचा कॉल आला आणि बेत ठरला.
जावळीच्या खोऱ्याचा , वरंदघाटातून सह्याद्रीच्या कडा तुडवत शिवथरघळला
जाण्याचा. वरंदघाटात जाण्याचा सुदीपचा आणि माझा योग तब्बल ६ वर्षानंतर जुळून आला.
मधल्या काळात मी मात्र हा भाग मी इतका फिरलो कि मला वरंदघाटाचा कानाकोपरा माहित
झाला. प्लान पक्का झाला शनिवारी सकाळी ६.३० ला वरज्यातून निघायचे.
शनिवारची सकाळ उजाडली सकाळी ५.३० ला सुदीप ला वेंकउप कॉल दिला आणि साधारणतः ७ वाजता आम्ही वारजे सोडल. प्रचंड आनंद झाला. यात काय विशेष प्रचंड आनंद होण्यासारखं ? हे फक्त ज्या ज्या लोकांनी सुदीप बरोबर प्रवास केला आहे त्यांला समजेल. मी ह्या फेरीला सुदीप वर खुश होतो फक्त ३० मिनिटांचा उशीर ... भन्नाट प्रगती. सुदीप गाडी चालवत होता मी पाठीमागे बसलो होतो आणि आम्ही सुसाट वेगात हायवेला लागलो. रस्तावरची जड वाहन पाहून मी एक दोनदा सुदीपला वेग कमी करण्याची निष्फळ विनंती करून नाद सोडला. चिंगाट भुंगाट वेगात कधी दरीपूल आणि बोगदा क्रॉस केला कळले नाही. शिवापूरच्या साईछाया मिसळ हाउसला मिसळ खाण्याचा विचार होता पण हॉटेल बंद होते म्हणून शेजारच्या एका हॉटेल मध्ये मिसळ-चहा-बिस्किट असा नाष्टा झाल्यावर पुढे पेट्रोल पंपवर गाडीलाहि पोटभर खाऊ दिला आणि कापूरहोळच्या दिशेने निघालो. कापूरहोळहून भोर. भोर मध्ये नदी क्रॉस करताना काही वर्षांपूर्वी कुर्डूवाडी ग्यांग बरोबर घातलेली धमाल आठवली. शिवाजी चौकात महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून वरंदघाटाचा रस्ता धरला.
रस्त्यात नीरा देवघर धारणाच्या वर एका ठिकाणाहून पूर्ण पसरलेलं धरण पाहायला मिळत , धरण भरायला अजून किमान १ महिन्याचा कालावधी लागेल. आत्ता मात्र पाणी तळाला गेलेलं. पण हे धरण जेव्हा भरत तेव्हा ह्या स्पॉट वरून सुंदर फोटो काढता येतात. आम्हीही तिथं थांबलो थोडा विरंगुळा केला आणि certainly काही फोटो हि काढले. या ठिकाणी सुदीप मधला फोटोग्राफर जागा झाला आणि माझा फायदा झाला. गाडीच्या किल्ल्या माझ्याकडे आल्या. धारणा पासून पुढे वरंदघाटाच्या रस्त्यावर लागणारी छोटी छोटी गाव (पाडे) आपण कोकणात जात आहोत याची जाणीव करून देतात. ह्या रस्त्या वर गाडी चालवण्याचा एक वेगळाच आनंद आहे.
गेली आठ दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसानी आज सुट्टी घेतली होती. तरीपण मागे राहिलेल्या काही उनाड ढगांची चादर आसमंतात पसरली होती .सूर्य हि आळासावला होता मधून मधून त्यालाहि आपल्या कामाची जाणीव होत होती तेव्हा हळूच ढगांची चादर बाजूला करून तो डोकावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. आसाच पाठ-शिवणीचा खेळ खेळत आणि निसर्गाची हिरवाई डोळ्यात साठवत मी गाडी चालवत होतो. अशा सुंदर वातावरणात सारे रोजचे विचार , टेन्शन ह्या पासून सुटका मिळते आणि सुरु होतो निसर्गाबरोबरचा संवाद. बराच काळ सुदीप पण शांत होता , मला पाठीमागे वळून बघायची गरज नव्हती कारण मला माहित होते तोही निसर्गाशी कनेक्ट होतोय. दरी खोर्यातून वाहणारा वारा झाडांमधून वाट काढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा ह्याच प्रयत्नातून एक मधुर संगीत निर्माण होत होत . ह्या संगीताला खळखळनाऱ्या धबधब्याची आणि झाऱ्यानची साथ लागत होती आणि पक्षांनीही त्यावर ठेका धरला होता. अशा मनोरम वातावरणात वाघजाईच मंदिर जवळ येताना दिसलं.
वाघजाई मंदिराच्या शेजारी
पवार काकूंच्या चहाच्या टपरी जवळ गाडी लावली. एक फक्कड चहा मारला आणि समोर
पसरलेल्या अथांग निसर्ग सौंदर्याचा देखावा न्याहाळू लागलो. मंदिरा समोरच्या कठड्या
वर उभा राहून पाहत होतो- हिरवाईन नटलेली डोंगर रांग. जिकडे बघावं तिकडे फक्त हिरवळ
हिरवळ आणि हिरवळ. डोंगर माथ्यावर काही ढग विसावले होते आणि त्यात कोसळणाऱ्या दुधाळ
धबधब्यानमुळे एक विहंगम दृष निर्माण झाले होते. खूप शांत. हा निसर्गाचा सोहळा
पाहून खूप अभिमान वाटला कि हाच तो माझा सह्यगीरीने समृद्ध महाराष्ट्र.
कॅमेऱ्याच्या शटरच्या आवाजाने मी तन्द्रीवर आलो सुदीप बाजूला उभा होता त्याच्या
कॅमेऱ्यात समोरचा देखावा टिपत होता. अजून काही चहा , वडापाव भजी खाऊन झाल्यावर
आम्ही तिथून निघालो. पुढे एक खिंड लागते त्याच्या उजव्या बाजूला
कावळा किल्ल्या कडे जाण्याचा रस्ता आहे. आम्ही तिकडे वळलो. थोडं फोटोसेशन करून
किल्ल्या कडे न जाता मुख्य मार्गावर येऊन शिवथरघळ कडे
निघालो.
वळणा वळणाचा घाट संपवत माझेरी गावच्या जवळ
पोहोचलो , तिथून उजव्या बाजूला एक फाटा लागतो जिथून शिवथरघळ फक्त ६ किलोमीटर आहे पण
हा रस्ता कच्चा आहे. आम्ही त्या रस्त्याने जायचे ठरवले. शिवथरघळला उतरताना कसबे
शिवथरचे जे काही दृष्य दिसते ते अवर्णनीय आहे. रस्ता खराब असल्याने थोडी कसरत
करावी लागली पण हरकत नाही. जस गाव जवळ आल तसा गाडीला वेग आला. झाडांच्या गर्दीतून
जाणारा रस्ता तुम्हाला अचानकपणे न्हेऊन ठेवतो अजस्त्र धबधब्या समोर. मंदिराच्या
पायथ्याला गाडी लावली. कोसळणाऱ्या धाबदाब्या कडे आम्ही दोघे कौतुकाने पाहत होतो.
साधारणता १०० पायऱ्या असतील , काही पायऱ्या चढल्यानंतर डाव्या हाताला गणपतीच मंदिर आहे. गणपतीच्या मूर्ती शेजारी छान विठ्ठल रूक्मींनी ची मूर्ती आहे. दर्शन घेऊन सभामंडपाकडे निघालो. प्रवेशाला डाव्या बाजूला रेसेप्शन काउंटर आणि थोड पुढे चपला ठेवण्याची व्यावस्ता. चपला काढल्या आणि शेजारी असलेल्या नळावर तोंड हातपाय धुतले. त्या जागेवरून धाबदबा आणखी रुद्र दिसतो. थोडीशी शुधा भागून मोर्चा प्रसाद(खिचडी ) वाटप जिथे चालला होता तिथे वळवला. जरी प्रसाद असला तरी दणकून खिचडी हाणली, मन तृप्त झाले. मग पुढचा कार्यक्रम. मंडपातून बाहेर पडल्यावर लगेच घळ चालू होते. घळ म्हणजे काय. पाण्याचा प्रवाहाने पाषाणात तयार झालेली गुहा. ह्या घळीला महत्व का ? कारण याच ठिकाणी सन १६५४ मध्ये रामदास स्वामींनी दासबोध ह्या ग्रंथाचे कथन केले आणि ते कल्याण स्वामींनी लिहून काढले. याचीच एक प्रतिकृती त्याठिकाणी बनवली आहे. त्या प्रतिकृती शेजारी मारुतीचे मंदिर आहे. अर्थातच जिथे रामदास स्वामी तिथे मारुतीच मंदिर हवाच. दर्शन घातले परिक्रमा केली आणि काहीकाळ तिथच विसावलो. विचार करत होतो कि त्याकाळी इथ काय वातावरण असेल. प्रचंड गूढ.
साधारणता १०० पायऱ्या असतील , काही पायऱ्या चढल्यानंतर डाव्या हाताला गणपतीच मंदिर आहे. गणपतीच्या मूर्ती शेजारी छान विठ्ठल रूक्मींनी ची मूर्ती आहे. दर्शन घेऊन सभामंडपाकडे निघालो. प्रवेशाला डाव्या बाजूला रेसेप्शन काउंटर आणि थोड पुढे चपला ठेवण्याची व्यावस्ता. चपला काढल्या आणि शेजारी असलेल्या नळावर तोंड हातपाय धुतले. त्या जागेवरून धाबदबा आणखी रुद्र दिसतो. थोडीशी शुधा भागून मोर्चा प्रसाद(खिचडी ) वाटप जिथे चालला होता तिथे वळवला. जरी प्रसाद असला तरी दणकून खिचडी हाणली, मन तृप्त झाले. मग पुढचा कार्यक्रम. मंडपातून बाहेर पडल्यावर लगेच घळ चालू होते. घळ म्हणजे काय. पाण्याचा प्रवाहाने पाषाणात तयार झालेली गुहा. ह्या घळीला महत्व का ? कारण याच ठिकाणी सन १६५४ मध्ये रामदास स्वामींनी दासबोध ह्या ग्रंथाचे कथन केले आणि ते कल्याण स्वामींनी लिहून काढले. याचीच एक प्रतिकृती त्याठिकाणी बनवली आहे. त्या प्रतिकृती शेजारी मारुतीचे मंदिर आहे. अर्थातच जिथे रामदास स्वामी तिथे मारुतीच मंदिर हवाच. दर्शन घातले परिक्रमा केली आणि काहीकाळ तिथच विसावलो. विचार करत होतो कि त्याकाळी इथ काय वातावरण असेल. प्रचंड गूढ.
घळीतून बाहेर धाबदाब्या
शेजारी आलो. हा धबधबा फार लांबचा प्रवास करून येतो. जुलै महिन्याच्या शेवटी किवा
ऑगस्ट मध्ये हा धाबदाबा इतका प्रचंड असतो कि त्याच्या आवाजाने हृदयाचे ठोके
चुकतात. घळीतून बाहेर उजव्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहे वर गेल्यावर
धाब्दाब्याचा आणखी सुंदर नजरा दिसतो. वर जाऊन थोडावेळ सुदीप आणि मी गप्पा मारत
बसलो. आता परतीचे वेध लागले. खाली उतरलो आणि परत निघताना तिथे काही लोक रानमेवा
विकत बसले होते त्यांचा कडून फणसाच्या उकडलेल्या बिया घेतल्या आणि त्या चघळत आम्ही
खाली उतरलो. बऱ्याच आठवणींना कुलूप बंद करून आम्ही गाडीवर स्वार झालो. पुढ आल्यावर
पुलाच्या इथे वरून वाहून आलेल्या धाबदाब्याच्या निळ्याशार पाण्याचा कुंड खुनाऊ
लागला. मग म्हटलं पिक्चर अभी बाकी है दोस्त आणि गाडी बाजूला लावली. अर्धा तास तिथे
पोहलो आणि मग मात्र शिवथरघळ – कुनबे शिवथरचा निरोप घेतला.
आता मुख्य रस्त्याने परत
निघालो. गाडीला वेग आला. मला घाई झाली होती कि गाडीला कोणासठाऊक. पण आत्ता रस्ता
झपाझप कपात बिरवाडी – वरंद – माझेरी करत वाघजाई मातेच्या मदिराजवळ पोहचलोही. तिथे
चहा घेऊन. भोर –कापूरहोळ – शिंदेवाडी – कात्रज – वारजे नॉन स्टोप आलो आणि एका
सुंदर अविस्मरणीय प्रवासाला पूर्ण विराम लागला. खरतर पूर्ण विराम म्हणणं चुकीच ठरेल
फार फार तर स्वल्पविराम बोलूयात. कारण सुदीपचा निरोप घेताना what next? हा प्रश्न आम्हाला पडलाच. तर किमान एक आठवडा थांबावच लागेल पुढच्या प्रवास
वर्णना साठी ... Stay tuned
Very Nice Harshad , Keep it up ... :)
ReplyDeleteThanks Mohsin .. yes I will :)
DeleteIts nice to know about कोराईगाड and your experience in exploring it. Even I am enthralled to travel there soon.
ReplyDeleteThanks Naj
DeleteYou have penned down your experience very well. Some day I will definitely visit and experience it. Thanks for sharing your thoughts. It is inspiring.
ReplyDeleteYes Harshal.. you should .. thank you
DeleteNice Article .... Brings back memories of my visit to Shivthar Ghal .. A must visit place for all Trekkies ...
ReplyDeleteFor sure Mahesh
DeleteKhupch Chan... Vachatana ajibat bore nai zal...awesome.. Bhel jamun aliy...
ReplyDeleteKhupch Chan... Vachatana ajibat bore nai zal...awesome.. Bhel jamun aliy...
ReplyDelete